Crime : ‛ती’ चोरलेली वाळू ‛खोर’ च्या ओढ्या लागत असणाऱ्या जमिनीतील, केडगाव, खोर, वरवंड, यवत येथील ओढ्यांची सखोल चौकशी झाल्यास अनेक मासे हाती लागणार



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यात सध्या वाळू माफियांनी उच्छाद मांडला आहे. काल पोलिसांनी पकडलेली वाळू ही ‛खोर’ च्या ओढ्यालगत असणाऱ्या शेतजमिनी मधून काढल्याचे समोर आले आहे त्यामुळे आता त्या ओढ्यातून आणि शेतजमिनीतून वाळू काढणारे वाळू माफिया, शेतजमीन मालक, जेसीबी यंत्र चालक, मालक यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये सध्या चोरट्या पद्धतीने वाळू उपसा सुरू आहे. कुठलीही परवानगी नसताना हे माफिया दिवस-रात्र पोलीस आणि महसूल यंत्रणेला आवाहन देत आपले काम बजावत आहेत.

केडगाव परिसरात असणाऱ्या धुमळीचा मळा, हंडाळवाडी, केडगाव गावठाण, देशमुख मळा, 22 फाटा अशा अनेक ठिकाणच्या ओढ्यातून आणि ओढ्या लगतच्या शेत जमिनीतून लाखो रुपयांची वाळू दररोज चोरी करून विकली जात आहे. हीच परिस्थिती खोर, यवत, वरवंड येथीलही ओढ्या नाल्यांची आणि त्या शेजारील शेतजमिनींची असून निर्ढावलेल्या या वाळूमाफियांवर आता कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

दौंड तालुक्यात वाळू वरून खून पडल्याची प्रकरणे अनेकवेळा घडली आहेत मात्र तरीही याकडे कानाडोळा करणे किती महाग पडू शकते हे विविध घटनेंनवरून दिसून आले आहे. मुजोर बनलेल्या या वाळू माफियांना संघटित गुन्हेगारीचे कलम वापरून त्यांचा बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे अन्यथा हे माफिया पुन्हा एकदा डोईजड होऊन कुणाचा ना कुणाचा खून पाडल्याशिवाय राहणार नाहीत अशी भीती सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.