दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील वाखारी, यवत, देलवडी येथे नव्याने 3 कोरोना रुग्ण सापडल्याने पुन्हा एकदा ग्रामीण भागातील नागरिकांच्या चिंता वाढल्या आहेत.
यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार दि. 25 ऑगस्ट रोजी 70 जणांचे स्वॅब घेऊन ते प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते.या 70 जणांपैकी वाखारी 1, यवत 1 आणि देलवडी 1 असे 3 जण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर उर्वरित 67 जण हे निगेटिव्ह आले आहेत.
दिवसेंदिवस कोरोना आपले जाळे पसरवत असून या साखळीला तोडण्यासाठी नागरिकांनी स्वतः होऊन यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच ही साखळी तोडण्यात यश येईल असे मत आरोग्य अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.