दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यात कोरोना आपले जाळे पसरवत असताना त्याने शहरालाही तितकेच टार्गेट केले आहे. दौंड शहरांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण सापडत असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्यावतीने करण्यात येत आहे.
आज प्राप्त झालेल्या ताज्या अहवालानुसार 53 पैकी 7 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे दिनांक 27/8/2020 रोजी एकुण 53 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती, त्यांचे रिपोर्ट अर्ध्यातासात प्राप्त झाले. त्यापैकी एकूण 7 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तर 46 व्यक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 2 महिला आणि 5 पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये बोरवकें नगर 1, पानसरे वस्ती 1, दौंड 2, भोईटे नगर 1, Ptc नानविज 1, आणि गांधी चौक 1 असा विभाग निहाय अहवाल प्राप्त झाला आहे. पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे 23 ते 57 वर्ष या वयोगटातील आहेत.