उद्या होणाऱ्या गणपती विसर्जनाबाबत दौंड पोलिसांचे नागरिकांना आवाहन, अन्यथा कारवाई होणार…



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

सर्व दौंड वासियांना दौंड चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांतर्फे आवाहन करण्यात आले आले असून, उद्या गणेश विसर्जनचा दिवस असल्याने नागरिकांनी जसे दहा दिवस अतिशय शांततेत नियम पाळून गणेशाची आरास केली त्याच पद्धतीने उद्याही शांतता पाळून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. तसेच 10 दिवस जे नागरिकांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांनी नागरिकांचे आभारही मानले आहेत.

सध्या भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये एका एका दिवसात जवळजवळ 80 हजार कोरोना पेशंट मिळून येत आहेत. प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे तरीसुद्धा काही महानगरांमध्ये व्हेंटिलेटरची कमतरता जाणवत आहे. वयस्क नागरिकांना व ज्याला दुसऱ्या आजाराची हिस्टरी आहे त्यांना कोरोनाचा धोका सर्वाधिक आहे. लहान मुलांना सुद्धा या आजाराची लागण झाल्यास खूप त्रास होत आहे. म्हणून माझी सर्व दौंड वाशी यांना विनंती आहे की आपले सर्व हॉस्पिटल्स जवळजवळ पूर्ण क्षमतेने भरली आहेत. आपण उद्या गणेश विसर्जन मिरवणूक मध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी करू नये. सार्वजनिक मंडळाचे प्रमुख तीन ते चार कार्यकर्ते गणपती विसर्जन करतील त्या भागातील खाजगी गणपती हे सुद्धा सार्वजनिक मंडळासोबत त्या-त्या भागातील लोकांनी विसर्जनासाठी घरात आरती करून पाठवायचे आहेत किंवा प्रत्येक सोसायटीने आपल्या सोसायटीतील खाजगी गणपती सर्वांचे एकत्र करून प्रमुख एक दोन सोसायटी सभासद किंवा त्या भागातील कार्यकर्ते हे गणपती विसर्जनासाठी नदीला घेऊन येतील असे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले आहे. 

कोणत्याही प्रकारे रस्त्यावर किंवा नदीला गणपती विसर्जनासाठी गर्दी होणार नाही, कुणीही ही गणपती  मंडळांच्या स्वागतासाठी स्वागत कमान उभारणार नाही. कोणतेही 50 वर्षावरील जेष्ठ नागरिक व दहा वर्षाखालील मुले हे गणपती विसर्जनासाठी नदीकाठी येणार नाहीत. विसर्जनासाठी येणारे सर्व भाविक हे तोंडाला मास्क लावून व सोबत सॅनिटायझरची बॉटल घेऊन येतील, तसेच कोणत्याही प्रकारचे पारंपारिक वाद्य किंवा म्युझिक हे आपणाला मिरवणुकी सोबत परवानगी देण्यात आलेली नाही. कारण वाद्य वाजल्यास सामाजिक अंतर राहत नाही व लोक जमा होतात. त्यामुळे असा कोणी प्रकार केल्यास कारवाई करण्यात येईल विना मास्कची कारवाई उद्या दौंड पोलीस ठाण्यात तर्फे सक्त करण्यात येणार आहे असेही त्यांनी पुढे सांगितले आहे. 

सामाजिक अंतर ठेवणे व तोंडाला मास्क लावूनच संवाद साधणे व सॅनिटायझर  चा सारखा वापर करणे सध्यातरी कोरणा हरवण्यासाठी ही त्रिसूत्री आपल्याला उपयुक्त आहे. उद्या सर्वांनी विसर्जन संध्याकाळी पाच वाजण्याच्या आतमध्ये पूर्ण करून घ्यावे कारण नदीला सुद्धा पाण्याचा प्रवाह जास्त आहे. कोणत्याही प्रकारचा विघ्न येऊ नये म्हणून सर्वांनी सूर्यास्ताच्या आत विसर्जन उरकून घ्यावे. शक्य असल्यास आपल्या परिसरातील कृत्रिम तलाव किंवा विहिरीमध्ये विसर्जन उरकून घ्यावे, खेडेगावातील लोकांनीसुद्धा कोणत्याही प्रकारे मिरवणूक काढू नये जवळच असणाऱ्या विहीर किंवा तलावात किंवा नदीत विसर्जित करावे शक्‍यतो जवळ असणाऱ्या जलस्रोत यामध्ये विसर्जन करावे आतापर्यंत सर्वांनी नियम पाळण्याबाबत सहकार्य केले याहीपुढे आपण कराल हे प्रशासनासाठी आणि आपल्या स्वतःसाठी सुद्धा फायद्याचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे. 

दौंड पोलीस ठाण्यातर्फे 100 पोलीस व एस आर पी चे दोन सेक्षन असा उद्या गणपती विसर्जनासाठी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक हे स्वतः दौंड मध्ये उपस्थित राहणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.