‛राहू’ येथील नदीत बुडालेल्या ‛त्या’ युवकाला शोधण्यासाठी मुळशी आपत्ती व्यवस्थापण समितीच्या स्पीड बोट तैनात



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील राहू येथे काल सायंकाळी गणपती विसर्जन करण्यासाठी नदीत उतरलेला युवक गणेश मूर्ती विसर्जन करत असताना नदीच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर त्याला शोधण्यासाठी आता मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्पीड बोट नदीत उतरविण्यात आल्या आहेत.

 

काल गणेश विसर्जन असल्याने दौंड तालुक्यात सर्वत्रच उत्साहात आणि नियमांचे काटेकोर पालन करून गणेश विसर्जन केले गेले होते. मात्र राहू गावामध्ये गणेश विसर्जन करण्यास गेलेला युवक पाण्यात वाहून गेल्याने येथील उत्साहाचे वातावरण दुःखात बदलले आहे. राहू येथील ग्रामस्थ रात्रीपासून या युवकाचा शोध घेत आहेत मात्र अजूनही हा युवक सापडत नसल्याने येथील नागरिकांमध्ये चिंतेचे पसरले आहे.

 

नदीत वाहून गेलेल्या युवकाचे नाव दुर्गेश पंडित असून तो नुकताच 10 वी उत्तीर्ण होऊन 11 वीत गेला होता. दुर्गेश हा गणेश मूर्ती विसर्जन करत असताना अचानक पाण्यात बुडू लागला त्यावेळी येथील सर्प मित्राने धाडस करून वाहत्या पाण्यात उडी मारत त्यास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने त्याला त्यामध्ये यश आले नाही. यानंतर रात्रभर त्या युवकाला शोधूनही तो सापडत नसल्याने अखेर मुळशी आपत्ती व्यस्थापण समितीला पाचारण करण्यात आले असून त्यांच्यातर्फे स्पीड बोटी पाण्यात उतरवून त्या युवकाचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.