केंद्र सरकारचा पुन्हा चीनला दणका ! पब्जीसह 118 चिनी अ‍ॅप्सवर बंदी



नवी दिल्ली : वृत्तसंस्था

केंद्र सरकारने आज पुन्हा एकदा धाडसी निर्णय घेत पबजीसह 118 चिनी मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 

या अगोदरही केंद्र सरकारने 99 पेक्षा जास्त चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा 118 अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं घेतला असल्याचे ANI या वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे.  

बंदी घालण्यात आलेल्या

अ‍ॅप्समध्ये पबजी,  कॅमकार्ड, बायडू, कट कट, वूव, टेन्सेंट वेयून, राईज ऑफ किंग्डम्ज, झॅकझॅक यासह अनेक  अ‍ॅप्सचा समावेश आहे ज्यावर आता केंद्र सरकारने बंदी घातली आहे. 

देशाच्या सुरक्षिततेला या अ‍ॅप्सकडून धोका असल्याचे आणि त्यामुळेच बंदीसारखी कारवाई केली असल्याचे केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.