Ajit Pawar’s appeal to the people – सध्याची परिस्थिती पाहता नागरिकांनी आता नक्कीच ‛हि’ काळजी घ्यावी : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे राज्यातील जनतेला आवाहन



|सहकारनामा|

मुंबई : राज्याच्या काही भागामध्ये सध्या  अतिवृष्टीमुळे पूरस्थितीची परिस्थिती बनली असल्यानं नागरिकांनी नदीपात्रात उतरण्याचं दु:स्साहस करणं टाळावं आणि सुरक्षितता, सावधानता बाळगावी असे कळकळीचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केलं आहे.



यावेळी अजित पवार यांनी अमरावती जिल्ह्याच्या वरुड तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथे नदीत नाव उलटून काही जण बुडाल्याची घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले असून बेपत्ता व्यक्तींचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती दिली आहे. 



या दुर्घटनेत मृत पावलेल्या बांधवांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.



राज्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती असल्यानं नागरिकांनी नदीपात्रात उतरण्याचं दु:स्साहस करणं टाळावं. सुरक्षितता, सावधानता बाळगावी असं कळकळीचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं आहे.