पुणेकरांना रेमडेसिविर इंजेक्शन विनामूल्य मिळणार? मग दौंडकरांना विनामूल्य कधी मिळणार?



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

 कोरोना बाधित गंभीर रुग्णास रेमदेसिविर इंजेक्शन देणे हा पर्याय मोठा फायदेशीर ठरत असल्याचा अनुभव सर्वच दवाखान्यात दिसून येत आहे. 

कोरोनावर अत्यंत प्रभावशाली औषध म्हणून याचा वापर होत आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा मोठा काळाबाजार होत असल्याचे समोर येत आहे.काळ्याबाजारात या इंजेक्शन ला मोठी किंमत मोजावी लागत असल्याने ते खरेदी करणे येथील सामान्य रुग्णांच्या आवाक्या बाहेरचे झाले आहे. 

पुण्यातील एका बैठकीमध्ये, रुग्णांना गरजेनुसार रेमदेसिविर इंजेक्शन विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त व जम्बो कोविड रुग्णालयाच्या कार्यकारी अध्यक्ष रुबल अग्रवाल यांनी दिली आहे. मग याच धर्तीवर दौंड करांना सुद्धा येथील गरजेनुसार रेमदेसिविर इंजेक्शन मोफत मिळावे म्हणून खासदार सुप्रिया सुळे व आमदार राहुल कुल यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी येथील बाधीत रुग्णांच्या नातलगांकडून होऊ लागली आहे.

दौंड शहर व परिसरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे तसेच येथील प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दौंड मध्ये आढावा बैठक घेऊन कोरोना बाबतच्या उपाय योजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत,

मात्र येथील तहसीलदार,तालुका आरोग्य अधिकारी, बीडिओ यांनाच कोरोनाची लागण झाल्याने ते उपचार घेत आहेत तर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांची बदली झालेली आहे मग कडक अंमलबजावणी करायची कोणी असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.