अबब… दौंड मधील SRPF च्या ‛29’ जवानांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहर व  परिसरातील कोरोनाचा उद्रेक सातत्याने वाढतोच आहे. ऑगस्ट महिन्या पासून तर बाधित रुग्णांच्या संख्येने कहरच केला आहे, येथील परिस्थिती प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे दिसते आहे. त्यामुळे शहर व  परिसरात नेमक्या कोणत्या उपाय योजना अमलात आणल्या तर परिस्थिती नियंत्रणात येईल यावर आता प्रशासनाला काम करणे गरजेचे झाले आहे. तसेच नागरिकांनीही  प्रशासनाला मदत करण्याची मोठी आवश्यकता आहे.

दि.7 सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने 209 संशयितांची रॅपिड अँटी जेन तपासणी करण्यात आली. प्राप्त अहवालानुसार त्यापैकी तब्बल 36 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर 173 जणांना कोरोनाने दिलासा दिला आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या 36 बाधित रुग्णां मध्ये 29 राज्य राखीव पोलीस दलातील जवानांचा (ग्रुप 5-24/ग्रुप 7-5) समावेश आहे, तर उर्वरित रुग्णांमध्ये शहरातील सहा व  ग्रामीण भागातील एकाचा समावेश आहे.

25 ते 51 वर्ष वयोगटातील 31 पुरुष व 5 महिलांना संसर्गाची ची लागण झाली आली असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. शहर व व परिसरातील वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी खूपच सतर्क राहून उपाय योजनांची अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे.