दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेठीस धरले असून यात जवळपास सर्वच देशांतील ग्रामीण आणि शहरी भाग या आजाराने व्यापला गेला आहे.
दौंड तालुक्यातील ग्रामिण भागामध्येही आता कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत असून आज यवत ग्रामीण रुग्णालयाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 13 गावांतील तब्बल 31 जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली.
13 गावांमध्ये यवत 4, केडगाव 4, वरवंड 4, कासुर्डी 4, (सहकारनामा sahkarnama.in) भरतगाव 3, देलवडी 3, लडकतवाडी 2, राहू 2, देऊळगाव गाडा 1, एकेरीवाडी 1, पडवी 1, बोरीपार्धी 1, देवकरवाडी 1, अशी गाव निहाय आकडेवारी आहे.
सापडलेल्या कोरोना बाधित रुग्णांमध्ये 22 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश असून बाधित रुग्णांचे वय हे 5 ते 68 वर्षे असे आहे. या बाबत आरोग्य अधिकाऱ्यांकडून वारंवार नागरिकांना सॅनिटायझर, मास्क वापरण्याचे आवाहन केले जात असून नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळणे हि काळाची गरज बनली आहे.