दौंड शहरात 8 जणांना नव्याने कोरोनाची लागण, आत्तापर्यंत 276 दौंडकरांची कोरोनावर यशस्वी मात



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

दौंड शहर व परिसरात कोरोना संसर्गाने चांगलाच वेग घेतलेला आहे. सध्या रोज सरासरी 10 ते 15 जणांना कोरोनाची लागण होत असल्याचे चित्र आहे. मात्र कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही  लक्षणीय आहे. 

आतापर्यंत 333 बाधित रुग्णांपैकी 276 रुग्णांनी कोरोना विरोधातील लढाई  जिंकली आहे. परंतु शहर व परिसरातील संसर्गाची साखळी तुटत नसल्याने रोज बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाबत प्रशासनाने दिलेल्या उपाय योजनांची नागरिकांनी कडक अंमलबजावणी करणे आवश्यक झाले आहे. दि 8 सप्टेंबर रोजी उपजिल्हा  रुग्णालयाच्या वतीने 115 संशयितांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली.  आज प्राप्त अहवाला नुसार 115 पैकी शहर व  परिसरातील 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

9 ते 82 वर्ष वयोगटातील 5 पुरुष व 7 महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मुख्य शहरातील आठ व ग्रामीण भागातील चार रुग्णांचा यामध्ये  समावेश असल्याची  माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.

कोरोना बाबतचा आजपर्यंतचा अहवाल…

उपजिल्हा रुग्णालयाने कोविड चाचणी केलेल्या एकूण व्यक्ती-5280. त्यापैकी 333 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह. आत्तापर्यंत 276 जणांनी कोरोना वर मात केली असून सध्या सक्रिय रुग्णांची  संख्या 48 आहे. यापैकी 25 रुग्ण उपजिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत तर घरी उपचार घेणाऱ्या  रुग्णांची  संख्या 23 आहे. एकूण 14 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला असून 7 पुरुष व  7 महिलांचा यामध्ये समावेश असल्याची  माहिती दौंड नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली  आहे.