दौंड शहरामध्ये 2 दिवसांत पुन्हा 15’ जण कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

कोरोना परिस्थिती समोर येथील प्रशासनासह दौंडकर हतबल झाले असल्याचे चित्र सध्या शहरामध्ये पहायला मिळत आहे. शहरातील झोपडपट्टी प्रभागा पासुन उच्चभ्रू वसाहती मध्ये बाधित रुग्ण आढळत आहेत.दि. 9 व 10 या  दोन दिवसात पुन्हा 15 नवीन  कोरोना रुग्णाची भर पडली असल्याचे समोर आले  आहे.

त्यामुळे दौंड करांची चिंता दिवसेंदिवस वाढतच आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने दि.9 व 10 सप्टेंबर रोजी शहर व परिसरातील एकूण 133 संशयितांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. आज प्राप्त अहवालानुसार त्यापैकी 15 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 9 ते 82 वर्ष वयोगटातील 9 पुरुष व 6 महिलांना संसर्गाची  लागण झाली आहे. शहरातील 9 व ग्रामीण भागातील 6 रुग्णांचा यामध्ये  समावेश असल्याची  माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.

तपासणी झालेल्या 118 व्यक्तींचे अहवाल निगेटिव आले आहेत यातच दौंडकर समाधान मानत आहेत. शहरातील वाढती रुग्णसंख्या पाहता दौंडकरांचे आरोग्य रामभरोसे अशी परिस्थिती  झाली आहे.