दौंड शहरवासीयांसाठीही आजचा दिवस दिलासादायक : शहरातील 111 व्यक्तींचा अहवाल आला निगेटिव्ह, तर 3 जणांना करोना ची लागण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)

सततच्या रुग्णसंख्या वाढीने त्रस्त झालेल्या दौंड करांना आज कोरोना ने दिलासा दिला आहे.  आज शहरातील फक्त एका व्यक्ती चा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे आजचा दिवस दौंड करांचा आत्मविश्वास वाढविणारा ठरला आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने दिनांक 11 सप्टेंबर रोजी शहर व  परिसरातील 114 व्यक्तींची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यापैकी फक्त 3 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

शहर व व परिसरातील उर्वरित 111 संशयितांचे अहवाल निगेटिव आले असल्याची  माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. 18 ते 55 वयोगटातील  तीन  पुरुष  रुग्णांना कोरोनाची लागण झाली  आहे. शहर-1/ ग्रामीण-1/ तसेच राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाचा बाधित रुग्णांमध्ये समावेश आहे. शहरातील संसर्ग कमी व्हावा म्हणून उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका व पोलीस प्रशासन यांच्याकडून प्रयत्न सुरु आहेत.

प्रशासनाच्या या  प्रयत्नांना दौंड करांनी सुद्धा साथ देणे गरजेचे आहे, तरच कोरोना ची हाताबाहेर गेलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश येणार आहे. लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांना गर्दी करू नका, घरा बाहेर पडताना मास्क लावा, मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार लोकांना समुपदेशन करा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.