यवत, दौंड कोविड सेंटरच्या अहवालामध्ये 17 जण कोरोना पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील यवत आणि दौंड कोविड सेंटरमध्ये आज दि.14 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये एकूण 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर तसेच दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे.

यवत ग्रामिण रुग्णालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या गावांमधून 29 लोकांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी बोरीपार्धी 1 आणि बोरीऐंदी 1, असे दोघेजण पॉझिटिव्ह आढळले तर दौंड उपजिल्हा रुग्णालयातर्फे एकूण 86 जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली होती त्यापैकी 15 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये 14 पुरुष आणि 1 महिलेचा समावेश असून 8 जण दौंड शहरातील तर 7 जण ग्रामीण भागातील आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे वयोमान हे 13 ते 62 वर्ष इतके आहे.