दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दोन दिवसाच्या विश्रांती नंतर आज कोरोनाने पुन्हा दौंडकरांना मोठा दणका दिला आहे. आज शहरातील तब्बल 14 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे दौंडकरांची चिंता चांगलीच वाढली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाने दिनांक 15 रोजी शहर व परिसरातील 74 संशयितांची रॅपिड अँटीजेन तपासणी केली असता त्यापैकी 23 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
7 ते 69 वर्ष वयोगटातील शहरातील 14 तर ग्रामीण भागामधील 9( गोपाळवाडी 8, लिंगाळी 1) जणांना नव्याने संसर्गाची लागण झाली असून 11 पुरुष व 12 महिला रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे. कोरोनाने शहरा बरोबर ग्रामीण भागातही चांगलाच प्रवेश केल्याचे समोर येत आहे.