यवत कोविड सेंटरच्या स्वॅब टेस्टमध्ये केडगाव, यवतसह या सात गावांमध्ये आढळले ‛कोरोना’चे ‛19’ रुग्ण



दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असल्यातरी कोरोना अजूनही आटोक्यात येताना दिसत नाही.

यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार 165 जणांची स्वॅब घेण्यात आले होते त्यापैकी 19 जण पॉझिटिव्ह आढळून आले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 3 वर्षाच्या बालकाचाही समावेश आहे.

एकूण सात गावातील 19 जण कोरोना बाधित झाले असून यामध्ये ‛सहकारनामा’ला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये केडगाव 9, यवत 3, भांडगाव 2, पडवी 2, खामगाव 1, वरवंड 1, देलवडी 1 अशी गावनिहाय आकडेवारी आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये 10 पुरुष आणि 9 महिला असून त्यांचे वयोगट हे 3 वर्षे ते 63 वर्षांच्या दरम्यान आहे.