दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अख्तर काझी)
दौंड शहर व परिसरात कोरोनाचा संसर्ग चांगलाच वाढताना दिसत आहे. विशेषतः गोपाळवाडी व परिसर कोरोना संसर्गाचा नवा हॉटस्पॉट ठरत असल्याचे समोर येत आहे, त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत.
दि.17 रोजी उपजिल्हा रुग्णालयाने 119 संशयितांची कोरोना तपासणी केली, त्यांचा अहवाल अर्ध्या तासातच प्राप्त झाला. तपासणी झालेल्या 119 जणांपैकी 12 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 107 जणांचा अहवाल निगेटिव आल्यामुळे थोडासा का होईना दिलासा मिळत आहे.
28 ते 60 वर्ष वयोगटातील 5 महिला व 7 पुरुष रुग्णांना संसर्गाची बाधा झाली असून शहरातील 5, गोपाळवाडी 3 तर ग्रामीण भागातील 4 रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांनी दिली आहे. रोजच वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने आता तरी आरोग्य तपासणी मोहीम सुरू करावी अशी मागणी शहर व परिसरातून होत आहे.