दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दिनांक 17/09/2020 रोजी यवत कोविड सेंटर मधून 15 गावांतील सुमारे 178 लोकांचे स्वॅब पुण्यातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते.
पाठविलेल्या या 178 नमुन्यांपैकी 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये यवत -9, केडगाव -5, कासुर्डी -3, भरतगाव -2, वाळकी -1, बोरिऐंदी -1, खोपोडी -3, गाडमोडी – 1, नाथाचीवाडी – 1, पारगाव – 1, खामगाव -1, खुटबाव -1, उंडवडी -2, एकेरीवाडी -2, सहजपूर -1 तसेच वडगाव शेरी (कर्मचारी) -3 अशी 15 गावांतील आकडेवारी समोर आली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे वय हे 7 वर्ष ते 53 वर्षे इतके असून नागरिकांनी कोरोनाबाबत कुठलाही हलगर्जीपणा न करता योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.