दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
दौंड तालुक्यातील गलांडवाडी येथील स्व.सुभाष आण्णा कुल दूध उत्पादक प्रक्रिया संघ व अमूल डेअरी यांच्यात नुकताच व्यवसाय करार झाला आहे. या करारा अंतर्गत स्व.सुभाष आण्णा कुल दूध उत्पादक प्रक्रिया संघाद्वारे दुधाचा पहिला टँकर काल अमूल डेअरीसाठी रवाना करण्यात आला. त्याचे पूजन दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्याहस्ते करण्यात आले.
यावेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी या करारामुळे परिसरातील दुधउत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळणार असून, जोडधंदा करणारे शेतकरी बांधव व इतर दूधउत्पादकांना आधार मिळेल असे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी दूध संघाचे संचालक, कामगार बांधव व परिसरातील दूध उत्पादक शेतकरी आवर्जून उपस्थित होते.