Coronavirus : यवत, केडगाव, राहु’सह 9 गावांतील 17 जण पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाईन 

दौंड तालुक्यातील ग्रामीण भाग सध्या कोरोना व्हायरसने ग्रस्त बनला आहे. दौंड शहरासह ग्रामीण भागातही दररोज कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आता नागरिकांनीच दक्षता घेणे काळाची गरज बनली आहे. 

यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आज गुरुवार दि.24 सप्टेंबर रोजी आलेल्या अहवालामध्ये 9 गावांतील 17 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

यवत ग्रामिण रुग्णालयाकडून 23 सप्टेंबर रोजी 68 स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यामध्ये 68 पैकी 17 जण पॉझिटिव्ह आले असून पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे

यवत (स्टेशन) -1, यवत गाव – 2, म्हसोबा चौक (यवत) -1, सहकार नगर (यवत) – 2, केडगाव (आंबेगाव) -.1, राहू- 3, देलवडी -1, भांडगाव -1, तांबेवाडी -2, पिंपळगाव-1, पारगाव -1, बोरीपर्धी -1 असे गावनिहाय रुग्णांची आकडेवारी समोर आली आहे.

पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे 26 वर्षे ते 82 वर्षे या वयोगटातील असून यामध्ये 15 पुरुष आणि 02 महिलांचा समावेश असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.