Pune : दौंड’चे आमदार राहुल कुल यांनी केले प्लाझ्मा ‛दान’, नागरिकांना केले ‛हे’ आवाहन



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. सुरुवातीच्या काळात शहरी भागापुरता मर्यादित असणारा कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागात झपाट्याने वाढत आहे. कोरोना बाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी गुणकारी ठरत आहे. परंतु रुग्णांची संख्या आणि प्लाझ्मादाते यांच्या संख्येत प्रचंड तफावत आहे.

प्लाझ्मा दात्यांचा तुटवडा जाणवत असल्याने कारणाने प्लाझ्मा दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन वेळोवेळी करण्यात येत आहे.

कोरोना बाधितांना जीवनदान मिळण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी आज प्रादेशिक रक्तपेढी- ससून सर्वोपचार रुग्णालय येथे जाऊन प्लाझ्मा दान केले आणि कोरोना विरुद्धचा लढाईला अधिक बळकटी मिळावी यासाठी प्रत्येक कोरोना मुक्त नागरिकाने पुढे येऊन प्लाझ्मा दान करावे असे आवाहनही केले.

यावेळी राहुल कुल यांनी बोलताना एकमेकांच्या साथीनेच आपण या संकटावर मात करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्यापरीने या कोरोना विरुद्धच्या युद्धामध्ये सहभाग घेऊन आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. जेणेकरून या जागतिक महामारीला आपण हरवू शकू असे मत शेवटी व्यक्त केले.