Crime – खुनाचा प्रयत्न, अट्रोसिटी गुन्ह्यातील आरोपीस ‛LCB’ कडून अटक



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

आज दि २८/०९/२०२० रोजी बारामती विभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या  बातमीवरून माळेगाव येथे सासवड पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वी 307, 324 सह अनु.जाती जमाती प्रतिबंधक कायदा  1989 कलम 6 सुधारीत कायदा 2015 चे 3(१) (r)(s) 3(2) (va) यातील पाहिजे असलेला फरार आरोपी नितीन उर्फ बापू उल्हास जाधव (वय 32 वर्षे रा इंदिरा नगर, सासवड ता पुरंदर. जि.पुणे) हा गुन्हा घडले पासून सुमारे  गेली सहा महिने फरार होता.

त्यास पुणे ग्रामिण LCB च्या पथकाने ताब्यात घेऊन पुढील तपास करीता सासवड पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले.

सदर आरोपीवर पहिले काही गुन्हे  असल्याचे त्याच्या गुन्हे अभिलेखावरून समोर येत असून त्याच्यावर 

१) सासवड पो स्टे गु र नं  142/2014  भा द वी का कलम 307, 143, 147 इतर

२) सासवड पो स्टे गु र नं  90/2018 भा द वी का कलम  326, 325, 109, 34 असे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई ही स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे, पो हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा ज्ञानेशवर क्षीरसागर, पो ना  विजय कांचन, पो शि धिरज जाधव, पो शि अक्षय नवले यांनी केली आहे.