दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
एक दिवसाचा दिलासा दिल्या नंतर कोरोना ने दौंड करांना पुन्हा दणका दिला आहे. शहरातील अवघ्या दोन वर्षाच्या बाळा सह तब्बल 21 जणांना नव्याने संसर्गाची बाधा झाली आहे, तर तपासणी झालेल्या 90 पैकी 69 लोकांचा अहवाल निगेटिव आला हीच थोडी समाधानाची बाब आहे.दि.30 रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व परिसरातील 90 संशयितांची रॅपिड अँटी जेन तपासणी करण्यात आली त्यापैकी 21 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. शहरातील 13 व ग्रामीण भागातील 8 रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. अवघ्या दोन वर्षाच्या बाळासह 62 वर्ष वयोगटातील 9 महिला व व 12 पुरुष रुग्णांना लागण झाली असून शहरातील पाटील चौक 5, सिद्धार्थ नगर 2, स्वप्न विहार अपार्टमेंट 1 तसेच राज्य राखीव पोलीस दल 5 या परिसरातील रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची ची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ संग्राम डांगे यांनी दिली आहे.