दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
शहर व परिसरात कोरोना चा प्रसार कधी कमी तर कधी जास्त होताना दिसतो आहे. एखाद दिवशी परिस्थिती नियंत्रणात आली आहे असे वाटत असतानाच लागलीच दुसऱ्या दिवशी बाधित रुग्णांची ची संख्या वाढल्याचा अहवाल समोर येतो अशी सध्या येथील परिस्थिती आहे.
त्यामुळे येथील प्रशासनही चक्रावून गेले आहे.दि.1 ऑक्टो. रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाने शहर व परिसरातील 93 संशयितांची कोरोना तपासणी केली असता त्यापैकी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
मात्र यामध्ये शहरातील फक्त चौघांचा समावेश असून इतर तीन रुग्ण ग्रामीण भागातील असल्याचे स्पष्ट होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे तब्बल 87 जणांचा अहवाल निगेटिव आल्याने प्रशासनावरील ताण थोडा कमी झाला आहे.
16 ते 75 वर्ष वयोगटातील 6 महिला व एका पुरुष रुग्णाला संसर्गाची बाधा झाली आहे. बाधित रुग्णांमध्ये पाटील चौक 2, गजानन सोसायटी 1, दत्तनगर, गोपाळवाडी1, राज्य राखीव पोलीस दल 1 तसेच काष्टी 2 या परिसरातील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.