अष्टविनायक मार्गाच्या कामाची आमदार Adv.राहुल कुल यांच्याकडून पाहणी



दौंड/देऊळगावराजे : सहकारनामा ऑनलाइन (प्रशांत वाबळे)

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी आज दौंड तालुक्याच्या पूर्वभागात चालू असलेल्या अष्टविनायक महामार्ग रस्त्याची पाहणी केली. यावेळी दौंड पासून ते शिरापूर पर्यंत त्यांनी रस्त्याची पाहणी केली.

या रस्त्याबाबत प्रत्येक गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांना काही अडचणी येत असतील तर त्या त्यांनी निसंकोच सांगाव्यात असे आ.कुल यांनी यावेळी आवाहन केले. 

यावेळी देऊळगावराजे येथील अभिमन्यू  गिरमकर, सतीश आवचर यांनी गावातील तुकाईनगर ते वडगाव दरेकर चौकापर्यत मागील काही दिवसांपूर्वी सार्वजनीक बांधकाम विभागातून आमदार राहुल कुल यांनी मंजूर करण्यात आलेली बंदिस्त गटार लाईन करण्यात आली होती. ती गटार लाईन आता या रस्त्यामध्ये जात आहे, त्यामुळे ती नवीन करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी आमदार राहुल कुल यांनी त्वरित सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी महारुद्र खबिले यांना त्या बाबत सूचना देत तुकाईनगर ते वडगाव दरेकर चौकापर्यत नवीन बंदिस्त गटारलाईन करण्यात येईल असे आश्वासन दिले.

या बंदिस्त गटार लाईनमुळे देऊळगावराजे येथील आडमाळ, इंदिरानगर, श्रीकृष्णनगर  आणि इतर भागातून येणाऱ्या सांडपाण्याची सोय होणार असून नागरिकांना मोठी मदत होणार आहे. 

यावेळी आमदार कुल यांनी बोलताना सदर ठेकेदार यांना या रस्त्याचे १२ वर्ष देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे त्यामुळे रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे होणार असल्याचे सांगितले.