मुंबई : सहकारनामा ऑनलाइन
राज्यपोलीस सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पारित करण्यात आले असून राज्यातील 119 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या गृहविभागामार्फत करण्यात आल्या आहेत.
या बदल्यांमध्ये विदर्भ भागातील अनेक अधिकाऱ्यांची पश्चिम महाराष्ट्रात नियुक्ती करण्यात आली आहे.
त्याचे प्रमाणे पुणे ग्रामीण पोलीस दलात ही मोठे बदल झाले असून धनंजय पाटील (भोर), राहुल धस (दौंड), मंदार जवळे (जुन्नर), तर अनिल लंबाते (खेड) यांची उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून संबंधित ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोना महामारीने डोके वर काढल्यानंतर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या रखडल्या होत्या. त्यामुळे लॉकडाऊन अनलॉककडे वाटचाल सुरू झाल्यानंतर गृहखात्या मार्फत 30 सप्टेंबर रोजी बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
105 अधिकाऱ्याना नियुक्ती ची ठिकाण देण्यात आली असून. 14 अधिकाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश स्वतंत्र काढण्यात येणार असल्याचे गृहविभागाने स्पष्ट केले आहे.