आजारी असतानाही देशाचे ‛गृहमंत्री अमित शहांनी’ दिला ‛दौंडकरांसाठी’ वेळ, दौंडला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्याचे दिले आश्वासन



नवी दिल्ली – सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

सध्या राज्यातील कारखानदारी संकटात सापडली आहे, दौंड तालुक्यातही तीच परिस्थिती असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी भाजपच्या वरिष्ठांसह देशाचे गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी आजारी असतानाही अमित शहांनी दौंडकरांसाठी वेळ काढून त्यांच्या अडचणी आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून समजून घेत मदत करण्याचे आश्वासन दिले.

महाराष्ट्रातील संकटात सापडलेल्या सहकारी साखर ऊद्योगापुढील विविध अडचणींसंदर्भात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फड़णवीस यांच्या नेतृत्वात  दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री व मंत्री गटाचे अध्यक्ष अमित शाह यांची दौंडचे आमदार राहुल कुल यांनी भेट घेतली. 

अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत मिळावी, थकीत कर्जाचे पुनर्गठन करण्यात यावे आदी प्रमुख मागण्यांसह साखर उदयोगाशी संबंधित विविध समस्यांवर यावेळी चर्चा झाली. यावेळी राज्यासह दौंडकरांना भेडसावणाऱ्या कारखाना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचनिंबाबत अमित शहांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दीले.

या बैठकीला दौंडचे आमदार राहुल कुल, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा, माज़ी केंद्रीय कृषि मंत्री राधा मोहन सिंह, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.