दौंडमधील कोरोना हद्दपार होण्याच्या मार्गावर, तपासणी झालेल्या 64 पैकी फक्त 4 रुग्णांना संसर्ग



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

दौंड शहर व  परिसरातील कोरोना संसर्गाची हाताबाहेर गेलेली परिस्थिती येथील उपजिल्हा रुग्णालय, नगरपालिका व  पोलीस प्रशासनाने राबविलेल्या कोरोना मुक्त ते साठीच्या उपाय योजनांमुळे चांगलीच नियंत्रणात आली असल्याचे दिसत आहे. मागील काही दिवसांमध्ये शहर व परिसरातील बाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झाली असल्याचे पहायला मिळत आहे. परंतु अजूनही कोरोना चा धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने नागरिकांनी येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये गाफील न राहता प्रशासनाने दिलेल्या  सूचनांचे पालन करून कोरोना विरोधी लढाईमध्ये प्रशासनाला सहकार्य करावे तरच शहर लवकरच कोरोना मुक्त होईल असे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दि.12 रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व  परिसरातील 64 संशयितांची रॅपिड अँटी जेन तपासणी करण्यात  आली, त्यापैकी फक्त 4 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून तब्बल 60 जणांना दिलासा मिळाला आहे.  ही समाधानाची बाब  आहे.25 ते 55 वर्ष वयोगटातील एक महिला व  तीन पुरुष रुग्णांना नव्याने संसर्गाची  लागण झाली असून शहरातील 3 व  ग्रामीण भागातील एका रुग्णाचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.