दौंड शहरात 10 तर केडगाव, राहू सह या 5 गावांत 7 जण कोरोना पॉझिटिव्ह

दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड शहर व  परिसरातील 10 जणांना नव्याने कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. तर यवत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्वॅबमध्ये 7 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

दोन दिवसावर आलेल्या नवरात्र उत्सव सणाच्या आधीच दौंड शहर आणि ग्रामीण भागात पुन्हा बाधित रुग्ण आढळल्याने दौंडकरांनी सतर्क राहूनच नवरात्र उत्सव साजरा करणे आवश्यक झाले आहे. गणेशोत्सवामध्ये घेतलेली काळजी आताही घेणे गरजेचे आहे. 

दिनांक 13 रोजी उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व  परिसरातील 25 जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते त्यापैकी 10 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे तर दिनांक 14 रोजी 36 जणांची रॅपिड अँटी जेन तपासणी करण्यात आली त्यामध्ये एकाही जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही ही खूपच समाधानाची बाब म्हणावी लागेल.

दि.13 रोजीच्या अहवालानुसार 10  ते 80 वर्ष वयोगटातील 6 महिला व 4 पुरुष रुग्णांना लागण झाली आहे. शहरातील 7 व ग्रामीण भागातील 3 रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.

यवत ग्रामीण रुग्णालयाकडून 13/10/2020 रोजी कोविड 19 साठी 58 स्वॅप पाठविले होते त्यापैकी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये केडगाव -2, यवत -1, सहजपूर -1, नानगाव- 1, राहू- 2, अशी गावनिहाय आकडेवारी असून यात 6 पुरुष आणि 1 स्त्रीचा समावेश आहे. या सर्वांचे वय हे 14 ते 73 वर्षांच्या दरम्यान आहे.