

दौंड : दौंड अर्बन बँकेचे चेअरमन तथा भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव, ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांचा वाढदिवस शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरा करण्यात आला.
शहरातील विविध राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी कटारिया यांची भेट घेत त्यांना पुढील यशस्वी राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कटारिया यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पतितपावन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश पाटील व के. के. आय इन्स्टिट्यूट (बुधरानी हॉस्पिटल) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र चिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन स्वातंत्र्य सैनिक विद्या भूषण कै. किसनदास गुलाबचंदजी कटारिया नागरी सहकारी पत संस्थेचे चेअरमन रमेश कटारिया व ऍड. अमोल काळे, व्यापारी उदय अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 250 महिला व पुरुषांची तपासणी करण्यात आली. यापैकी 131 जणांना नंबरचे चष्मे मोफत देण्यात आले,व 39 जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया संघटनेच्या वतीने करण्यात येणार आहे.
यावेळी मा. नगराध्यक्ष योगेश कटारिया, नगरसेवक बबलू कांबळे, प्रमोद देशमुख,पिंटू झेंडे आदि मान्यवर उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर पाटील, चंद्रकांत चौबे, रोहित पाटील, सुनील मुलचंदानी, केदार इंगळे, भीमराव पवार, रक्षित पाटील, रियाज पटेल, रतन जाधव, उमेश कांचन, मयूर मुलचंदानी, माणिक सोनवणे,
दत्तू बंड, कोंडीबा कुंभार, नामदेव लबडे, सुरेश मुलचंदानी, मुन्ना सय्यद,मुसा आत्तार, दत्ता अधिराज, नितीन मोरे, दाजी गोसावी यांचे सहकार्य लाभले.














