दौंडमध्ये कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत कमालीची घट, 93 पैकी फक्त 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

दौंड शहर व परिसरा वरील कोरोनाची वक्रदृष्टी थोडीशी कमी झाली आहे. सध्या बाधित रुग्णांपेक्षा तपासणी अहवाल निगेटिव्ह येणाऱ्यांची संख्या कित्येक पटीने जास्त दिसत आहे. बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत असल्याने प्रशासना सहित दौंड करांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

दि.15 रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने शहर व  परिसरातील 93 संशयितांची करोना तपासणी करण्यात आली त्यापैकी फक्त 6 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून 87 जणांना दिलासा मिळाला आहे.

25 ते 73 वर्ष वयोगटातील 2 महिला व 4 पुरुष रुग्णांना कोरोना ची नव्याने लागण झाली आहे. शहरातील 4 व  ग्रामीण भागातील 2 रुग्णांचा यामध्ये समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली आहे.