कुंजीरवाडीत चोरट्यांनी सोन्याचांदीचे दुकान फोडले



थेऊर : सहकारनामा ऑनलाइन (बापू धुमाळ)

पुणे सोलापूर महामार्गालगत कुंजीरवाडीमधील सोन्याचांदीचे दुकानात  अज्ञात चोरटयाने दुकानाचे  शटर उचकटून दुकानातील एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने चोरून नेले आहेत.

याप्रकरणी प्रशांत मच्छिंद्र चोरघे (रा.चोरघेवस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादी वरून अज्ञात चोरट्यांविरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरघे यांचे कुंजीरवाडी ( ता.हवेली ) येथे सोलापुर – पुणे महामार्गालगत एम. एल. चोरघे ज्वेलर्स नावाचे सोने चांदीचे दुकान आहे. सदर दुकानामध्ये अलार्म सिस्टीम बसवलेली आहे. जर कोणी दुकानाचे शटर तोडले, तर त्यामुळे दुकानातील अलार्म सिस्टीम ॲक्टीव होऊन चोरघे यांचे मोबाईलवर फोन येत असतो. 

अशा प्रकारची ती सिस्टीम आहे. रविवार त्यांनी नेहमीप्रमाणे दुकान उघडले. दिवसभर गि-हाईक करून सायंकाळी दुकान बंद करुन कुलुप लावून घरी  गेले. सोमवारी पहाटे ३ च्या  सुमारास त्यांना मोबाईलवर दुकानातील अलार्म सिस्टीम वरून फोन आलेने  दुकानाचे शटर कोणीतरी तोडलेले आहे त्यांनी तात्काळ  दुचाकीवरून दुकानाकडे धाव घेतली असता दुकानाचे दोन्ही शटर पुर्ण उघडलेले तसेच शटरच्या  लाॕक पटट्या तोडलेल्या होत्या.

आत जाऊन पाहणी केली असता त्यांना दुकानातील चांदीचे दागीने व वस्तू चोरीस गेल्याचे दिसले  यावर चोरघे यांनी कुंजीरवाडीचे पोलिस पाटील मिंलिद कुंजीर यांना  फोन  करुन तात्काळ  बोलावून घेतले  व अज्ञात चोरट्यां विरोधात लोणिकाळभोर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून पुढील तपास लोणी काळभोर पोलिस करत आहेत