दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)
दौंड शहरातील सेन्ट सेबॅस्टियन ज्युनिअर कॉलेज व विद्यालयाच्या हरित सेना विभागाच्या वतीने मिशन ७५० अंतर्गत ७५० वृक्ष दौंड परिसरात लावून त्याची जोपासना, एक विद्यार्थी एक वृक्ष यानुसार करण्यात येणार असल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य फादर डेनिस जोसेफ यांनी दिली.
या उपक्रमासाठी विद्यालयाला वन विभाग बारामती व दौंड तसेच राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक सात व पाचच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहयोग मिळाला आहे. पोप फ्रान्सिस यांच्या ही पृथ्वी म्हणजे आपल्या सगळ्यांचं घर आहे आणि याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे या संदेशापासून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण जागृती करून वृक्ष लागवड व जोपासना याचे महत्व पटवून देण्यात येत आहे.
संस्थेचे अध्यक्ष बिशप थॉमस डाबरे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त मिशन ७५० हे नाव देण्यात आल्याचे फादर जोसेफ यांनी सांगितले.