थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (बापू धुमाळ)
एल सी बी शाखेची धडाकेबाज कारवाई अवैध गांजा वाहतूक करणाऱ्यात दोन सराईतांच्या मुसक्या आवळण्यात यश आले असुन त्यांच्याकडून 4 लाख 20 हजार रु किमतीचा 28 किलो गांजा व एक चारचाकी कारसह अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 8 लाख 20 हजार रुपयेचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते यावर वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमण्यात आले होते या पथकास आज एका बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, एक गाडी नं एम एच १२ क्यू ए ४४७९ पांढऱ्या रंगाच्या यामध्ये अवैध रित्या गांजा वाहतूक होणार आहे ही गाडी थेऊर ते नायगाव पेठ मार्गे उरुळी कांचन रेल्वे लाईन पलीकडे रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला त्यानंतर त्या नंबरची पांढऱ्या रंगाची कार आलेवर सदर पथकाने गाडी ताब्यात घेतली त्यावेळी गाडीत दोन व्यक्ती होत्या गाडीत मागच्या डिकी मध्ये पांढऱ्या रंगाचे पोत्यात असलेला पदार्थ गांजा असलेची खात्री झाल्यावर त्या व्यक्तींची चौकशी केली असता त्यांची नावे १) तानाजी शंकर डुकळे वय 29वर्षे रा कोलवडी माळवाडी ता हवेली जि पुणे व २) शिवाजी शंकर डुकळे वय वय 31 वर्षे रा कोलवडी माळवाडी ता हवेली जि पुणे असल्याचे सांगितले तो गांजा विक्रीसाठी आणण्यात आला होता. पुढील तपास लोणी काळभोर पोलिस स्टेशन करीत आहेत सदरची कारवाई ही कारवाई पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे सहा पोलीस फौजदार दत्तात्रय गिरमकर पोलीस हवालदार राजेंद्र पुणेकर पोलीस हवालदार उमाकांत कुंजीर पोलिस हवालदार महेश गायकवाड पोलिस हवालदार निलेश कदम पोलिस नाईक विजय कांचन पोलिस नाईक जनार्दन शेळके पोलीस नाईक राजू मोमिन पोवीस कॉन्टेबल धिरज जाधव यांनी केली आहे