मोबाईल चोरी करणारे टोळके LCB शाखेकडुन जेरबंद, गुन्ह्यातील सर्व मुद्देमाल जप्त



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

दि ०१/११/२०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख सो यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील वॉन्टेड फरारी आरोपीचा शोध घेत असताना रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी गोपनीय बातमीदाराच्या माहिती वरून रांजणगाव पोलिस स्टेशन गु र न  ३२२/२०२० भा द वि का कलम 380 नुसार दाखल गुन्ह्यात एकूण वेगवेगळ्या कंपनीचे 3 मोबाईल किंमत रु १८००० असे चोरीस गेले होते. 

याबाबत माहिती घेतल्यानंतर यातील १ मोबाईल आदर्श गहिनीनाथ हुलगे (वय २० वर्षे रा.मु पो टाकळी ता माढा जि सोलापूर) हा वापरत असल्याचे समजले. त्यामुळे

सदर पथकाने सोलापूर येथे जाऊन वरील इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे सदर मोबाईल बाबत चौकशी केली असता सदरचा मोबाईल हा त्याने त्याचे इतर मित्रांसोबत रांजणगाव येथून चोरून आणल्याचे सांगितले.

त्यानंतर त्याकडे अधिक चौकशी केली असता इतर ३ मोबाईल हे त्याच्या मित्रांकडे असल्याचे त्याने सांगितले.  या वरून एलसीबी टीमने उत्कर्ष भीमराव बनसोडे (वय १९ वर्षे रा. न्यू बालाजी नगर उमरगा जि उस्मानाबाद) महादेव शंकर जमादार (वय २२ वर्षे रा हनुमान नगर  उमरगा जि.उस्मानाबाद) श्रींनिवास  जनार्दन मानेपाटील (वय रा.औटी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि उस्मानाबाद) असे वरील सर्व इसम ताब्यात घेऊन दाखल गुन्ह्यातील गेलेले  १८ हजारांचे ३ व आजून १ असे एकूण ४ मोबाईल मिळून आले आहेत. गुन्ह्यातील गेलेले मोबाईल तसेच वरील ४ इसम यांनी चोरून नेल्याचे सांगितल्याने वरील आरोपी यांची वैद्यकीय तपासणी करून गुन्ह्यातील मुद्देमाल सहित  त्यांना पुढील तपास कामी रांजणगाव पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

सदरची कारवाई ही पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शिवाजी ननवरे, सहा.फो दत्तात्रय गिरीमकर, पो हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो हवा ज्ञानेश्वर क्षिरसागर, पो.ना अभिजित एकशिंगे, पो.ना प्रवीण मोरे, पो ना राजू मोमिन, पो.ना विजय कांचन, पो कॉ धिरज जाधव, पो हवा काशीनाथ राजापूरे यांनी केली.