दौंड परिसरात 2 दिवसांत 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यामध्ये अजूनही काही ठिकणी कोरोना रुग्ण सापडत असून नागरिकांनी मास्क परिधान करून सॅनिटायझर चा वापर करणे गरजेचे बनले आहे.

दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 2/11/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 104 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. त्यांचे अहवाल प्राप्त होऊन 104 पैकी एकूण 3 व्यक्तीचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर 81 व्यक्ती चे अहवाल निगेटिव्ह आले.  पॉझिटिव्हमध्ये 3 पुरुषांचा समावेश होता.

त्यानंतर आज दिनांक 3/11/2020 रोजी उपजिल्हा रुग्णालय दौंड तर्फे एकुण 20 जणांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर 19 व्यक्तीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.