दौंड : सहकारनामा ऑनलाइन
दौंड तालुक्यातील केडगाव, वाखारी, चौफुला या ठिकाणी वाहनांतून डिझेल चोरी होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. व्यावसायिक कारणासाठी घेतलेली वाहने घरासमोर, रस्त्यावर उभी केल्यानंतर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन काही चोरटे वाहनांतून डिझेलची चोरी करत असल्याचा प्रकार या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
असाच काहीसा प्रकार दि. ०३/११/२०२० ते ०४/११/२०२० रोजी रात्री ११:३० ते पहाटे ३:३० वाचे दरम्यान वाखारी (ता.दौंड) या गावच्या हद्दीमध्ये घडला आहे. वाखारीमध्ये असणाऱ्या अक्षय स्पन पाईप कारखाच्या आवारातील टेम्पो नंबर एम.एच ४२ टी ४०२० व टेम्पो नं एम.एच ४२ टी.२०४० या दोन्ही व्यावसायिक वाहनांतून एकुण ११६ लिटर डिझेल ज्याची किंमत अंदाजे ८,८३० रुपये असून ते कोणीतरी अज्ञात चोरटयाने लबाडीचे इरादयाने चोरून नेले आहे.
याबाबत या शिवाजी भरत भापकर यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भापकर यांच्या म्हणण्यानुसार हे चोरटे चोरी करण्यासाठी तीन ते चार मोठ्या वाहनांचा वापर करत असून यामध्ये इनोव्हा, इंडिका व इतर काही वाहनांचा समावेश आहे.