CRIME : विनयभंग करून महिलेचे डोळे निकामी करणारा तो आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात, व्हाट्सअपवर फिरणाऱ्या पोस्टमध्ये दिसलेला हाच ‛तो’ आरोपी



पुणे : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

पुणे जिल्ह्यातील न्हावरा ता.शिरूर येथे महीलेचा विनयभंग करून तिचे दोन्ही डोळे निकामी करण्याऱ्या आरोपीस पोलिसांनी शिताफीने पकडले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार दि 03 नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजण्याचे सुमारास न्हावरा ता. शिरूर येथे  एक महिला शौचासाठी बाहेर गेल्यानंतर तिचा  अज्ञात व्यक्तीने विनयभंग करून तिचे डोळे निकामी केले होते. 

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहीया यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे शिरूर, शिक्रापूर, भिगवण, यवत, बारामती, दौंड, इंदापूर या विविध पोलिस स्टेशनचे पथक सदर आरोपीच्या तापसकमीमागे लावले होते.

यावेळी सदर गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी संपूर्ण जिल्ह्यात सदर संशयित आरोपीचा फोटो सोशल मीडियावर फिरवला होता. त्यामुळे याबाबत  गोपनीय बातमीदारा मार्फत स्थानिक गुन्हे शाखेचे पो.ना.मोमीन यांना माहिती मिळाली की  सदरचा गुन्हा घडल्यानंतर राजे कॉम्प्लेक्स परिसराचे समोरील बाजूस असणाऱ्या चायनिज सेंटरमध्ये काम करणाऱ्या एका वेटरने त्याचे दाढी व डोक्याचे केस काढलेले असून त्याचे वर्णन आणि गुन्ह्यातील पिडीतेने सांगितलेल्या वर्णनाप्रमाणे जुळत आहे. 

वरील संशयित हा सध्या कोठेतरी निघून गेला आहे अशी माहीती मिळाली. यानंतर  लागलीच पोलीस पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक देशमुख यांनी संशयीत इसमाचा शोध घेण्याकरीता तपास टिम तयार करून रवाना केल्या. त्याप्रमाणे टीमने संशयीत इसमाचा वावर असणारे परिसरात सी.सी.टी.व्ही.फुटेजची पाहणी करून सी.सी.टी.व्ही फुटेज हस्तगत केले व फुटेजच्या आधारे संशयीताचा शोध घेतला असता टीमला संशयीत इसमाचा स्वभाव हा रागीट, नेहमी दारूच्या नशेत धुंद, भगव्या रंगाचा मफलर वापरतो, नेहमी कोणाशीही कोणत्याही कारणावरून वाद घालतो, त्याचे हातात एक शंकराची पिंड व त्यावर नागाच्या फण्याचा आकार आहे, भिक मागत फिरतो, मुका असल्याचे ढोंग करतो अशी माहीती समजली. 

त्यानुसार पोलीस टीमने आरोपीचा मागमूस काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याचे नाव कुंडलीक साहेबराव बगाडे, (रा.उंडवडे सुपे, ता.बारामती जि.पुणे) असे असल्याचे समजले व त्याचा वावर हा श्रीगोंदा – पारनेर तालुक्यातील विविध गावात असल्याची माहीती समजली. यानंतर   ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत व पोलीस खबऱ्यांमार्फत श्रीगोंदा-पारनेर तालुक्यातील स्थानिक नागरीकांचे मदतीने प्रत्येक गावात व्हॉटसअॅपव्दारे व संदेशाव्दारे संशयीताची माहीती व्हायरल करीत त्याचे जाण्याचे मार्ग शोधून काढले तसेच संभाव्य जाण्याचे ठिकाणे पाहुन त्या ठिकाणी संशयीताचा शोध घेण्यात आला. 

गुन्हा झाले नंतर फिर्यादीनी दिलेली फिर्याद व जखमीने दिलेला जबाब यामध्ये केवळ आरोपीचे वर्णन व त्यांच्या अंगावर असलेला लाल रंगाचा गमजा एवढया माहितीवरून तैनात केलेले तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तपास करून अथक प्रयत्न करून आरोपीचे नाव निष्पन्न केले. 

त्यानंतर आज दि ०९ नोव्हेंबर रोजी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, सपोनि पोना हरीष शितोळे यांनी संध्याकाळी शिक्रापूर चाकण चौक येथुन संशयित ईसम कुंडलिक साहेबराव बगाडे यास ताब्यात घेतले. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे, शिरूर पोलीस स्टेशन हे करीत आहेत.

या गुन्ह्याच्या तपासाकामी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण. पोलीस निरीक्षक प्रविण खानापुरे, शिरूर पोलीस स्टेशन, सहा . पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे , स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण. सहा.पोलीस निरीक्षक जीवन माने भिगवण पो.स्टे. सहा. पोलीस निरीक्षक लंगोटे , बारामती तालुका पो.स्टे. पोलीस उप निरीक्षक शिवाजी ननवरे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, पोलीस उप निरीक्षक अमोल गोरे, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण. 

पोलीस उप निरीक्षक गणेश जगदाळे, शिरूर पो.स्टे. पोलीस उप निरीक्षक भगवान पालवे, शिरूर पो.स्टे. पोलीस उप निरीक्षक सुनिल मोटे , शिरूर पो.स्टे. पोलीस उप निरीक्षक राजेश माळी, शिक्रापूर पो.स्टे. पोलीस उपनिरीक्षक गंपले, भाऊसाहेब पाटील, यवत पो.स्टे. महीला पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे, दौंड पोलीस स्टेशन यांनी मेहनत घेऊन हि मोलाची कामगिरी केली आहे.