गाडी पार्क करण्याच्या वादातून दोघांवर गोळीबार, LCB कडून 8 तासात 2 मुख्य आरोपी जेरबंद



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

दि. १०/११/२०२० रोजी लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत दुपारी सुमारे १२:४५ च्या दरम्यान वाघोली गाव बकोरी फाटा येथे  फिर्यादी सुनिल रामदास गाडे (वय 31 वर्षे व्यवसाय गॅरेज रा. कॅनरा बँक च्या मागे बायफ रोड वाघोली) हे आपले गॅरेज येथे  आपली गाडी घेऊन आले असता तेथे अगोदर उभा असलेला टेम्पो नोंदणी क्र. एम एच १२ आर एन ३२२८ यातील चालक आणि फिर्यादी यांचे मध्ये टेम्पो बाजूला काढ न्यावरून किरकोळ वाद झाला.

सदरील टेम्पो चालकाने झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आपले इतर मित्र फिर्यादी यास मारण्यासाठी त्याठिकाणी बोलवले. सदर ठिकाणी 7 ते 8 जणांनी फिर्यादी व त्यांचे भाऊ  समीर आणि त्यांचे मित्र यांना कोयते आणि लाकडी दांडक्याने मारण्यास सुरवात केली.

सदरची भांडणे सोडवण्यास आलेले फिर्यादी यांचे दाजी नामे संतोष सातव यांच्यावर देखिल त्यांनी हल्ला केला. भांडण करण्यासाठी आलेल्या इसमापैकी एका इसमाने आपले कडील गावठी पिस्तुल काढून फिर्यादी यांचे दाजी यांच्यावर 2 वेळा फायर केले. यामध्ये फिर्यादी यांचे भाऊ समीर आणि मित्र इरफान शेख हे गंभीर रित्या जखमी झाले.

हि घटना घडल्यानंतर लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये कलम ३०७, १४३,१४७, १४८, १४९,३२३,५०४,५०६ मुंबई पो अधि कलम ३७(१) (३)  भा हत्यार कायदा कलम ३,२५ ४,२५  नुसार गुन्हा दाखल करण्यात येऊन  वरील गुन्ह्यातील हल्ला करणारे आरोपी हे अज्ञात असल्याने वरील गुन्हा उघडकीस आणणे कठीण होते.

यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकास गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीवरून सदर गुन्ह्यातील आरोपी हे हडपसर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहीतीवरून त्याठिकाणी सापळा रचून 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले.

या इसमांमध्ये १) ऋषभ रामदास  शेवाळे (वय २२ वर्षे रा.शेवाळे वाडी उरुळी देवाची ता हवेली जि पुणे) व २) संकेत सदाशिव पाटील (वय २१ वर्षे मूळ रा इरला ता जि उस्मानाबाद सध्या रा श्रेयस डेयरी हंडेवाडी रोड ससाणे नगर हडपसर पुणे)  यांचा समावेश असून सदरच्या इसमांनी वरील गुन्हा त्यांचे इतर साथीदार मार्फत केल्याचे सांगितले. 

यातील आरोपी पैकी आरोपी १) ऋषभ रामदास  शेवाळे यावर १) लोणी काळभोर पो स्टे गु र नं ८९५/१८ भा द वी १४३,१४४,१४७,१४८,१४९,

३२४ 

२)वानवडी पो स्टे गु र नं ६४/२०१७ भा द वि ३२३,३२४,५०४,५०६,३४ 

३)हडपसर पो स्टे गु र नं ५६४/२०१९ आर्म ऍक्ट ४,२५

४)लोनिकाळभोर पो स्टे गु र नं २/२०२० भा द वि ३०७, ३४ वरील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सदरील आरोपी हा गेली ३महिने झाले येरवडा कारागृहातून  पॅरोल रजेवर सुटलेला होता.

सदरील आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपास कामी लोणीकंद पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक श्री प्रताप मानकर हे करीत आहेत.

सदरची हि कारवाई पुणे ग्रामिण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक  पद्माकर घनवट, 

 पोलिस उपनिरिक्षक अमोल गोरे, सहा पो फो दत्तात्रय गिरमकर, पो हवा उमाकांत कुंजीर, पो ना विजय कांचन, पो ना जनार्दन शेळकेपो ना राजू मोमिन, पो कॉ धिरज जाधव, पो का समाधान नाईकनवरे यांनी केली.