दौंड तालुका : दौंड तालुक्यात एका राजकीय घडामोडीने मोठी खळबळ माजली आहे. पंचायत समितीचे मा.सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) गटाचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार यांना खडकी देऊळगाव राजे गटातून अचानक भाजप ची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याने मोठी खळबळ माजली आहे.
आप्पासाहेब पवार यांच्या निकट वर्तीयांनी आणि आमदार राहुल कुल यांच्या कार्यकर्त्यांनीही अप्पासाहेब पवार यांची भाजप उमेदवारी निश्चित झाल्याचे स्टेटस ठेवल्याने मोठा ट्वीस्ट निर्माण झाला होता मात्र याबाबत आप्पासाहेब पवार यांची प्रतिक्रिया घेतली असता मला भाजपकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सांगण्यात आले असल्याचे खरे आहे असे त्यांनी सांगितले. तर वासुदेव काळे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

दौंड तालुक्यात आप्पासाहेब पवार यांना मानणारा स्वतंत्र वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीला आप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली खा.सुप्रिया सुळे यांना दौंड तालुक्यात चांगले मताधिक्य मिळाले होते मात्र राष्ट्रवादी (श.प) पक्षाने विधानसभेला त्यांना डावलून माजी आमदार रमेश थोरात यांना उमेदवारी दिल्याने ते नाराज असल्याचे जाणवत होते. मात्र तरीही त्यांनी राष्ट्रवादीचे काम जोमाने सुरु ठेवले होते मात्र प्रत्येकवेळी डावलले जात असल्याने अखेर आप्पासाहेब पवार यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला असावा असा एकंदरीत अंदाज व्यक्त केला जात आहे.







