दौंडमध्ये एका इसमाकडून गावठी पिस्तुलासह 1 जिवंत काडतुस जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी अवैधशस्त्र बाळगनाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश (LCB) स्थानिक गुन्हे शाखेला दिल्यानंतर दि ११ नोव्हेंबर २०२० रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथून एका इसमाला गावठी पिस्तुल आणि एका जिवंत काडतुसासह जेरबंद केले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार LCB पथक दौड पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते त्यावेळी सदरच्या पथकास गोपनीय बातमीदार मार्फत देऊळगाव राजे येथील  छत्रपती चौकात एक इसम आपल्या कम्बरेला गावठी पिस्तुल  लावून उभा असल्याचे समजले. या माहितीवरून त्या ठिकाणी पथकाने जाऊन त्या इसमाची अंग झडती घेतली असता त्याच्या डाव्या कंबरेला बेल्टच्या आत एक लोखंडी वस्तू हाताला लागली सदरची वस्तू बाहेर काढून पाहिली असता सदरची वस्तू ही गावठी पिस्तुल असल्याचे समजले.

या व्यक्तीची अधिक झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या डाव्या खिश्यात एक जिवंत काडतुस मिळून आले. या व्यक्तीचे नाव गणेश उर्फ आबा बाबासो म्हस्के (वय 30 वर्षे रा देऊळगाव राजे मारुती मंदिर शेजारी ता दौड जि पुणे) असे असून त्याच्याकडून ४५ हजाराचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगजिन सह व १०० रु. किंमतीचे एक जिवंत काडतुस असा एकूण 

 ४५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यावर दौड पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) मुंबई पोलिस अधिनियम १५१ चे कलम१३५  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मुद्देमाल सह पुढील तपास कामी दौड पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिला आहे.

 वरील कारवाई ही पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी सुहास धस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट

पोलिस उपनिरीक्षक, शिवाजी ननावरे, पो.हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे, पो ना अभिजित एकशिंगे, पो ना विजय कांचन, पो कॉ धिरज जाधव तसेच दौड पोलिस स्टेशनचे पो.हवा शेख, पो ना सचिन बोराडे पोना बापू रोटे यांनी केली आहे.