अब्बास शेख
वरवंड (दौंड) : जिल्हा परिषद आणि पंचायतसमिती निवडणुकीची तारीख जाहीर होताच दौंड तालुक्यात असणाऱ्या सात जिल्हा परिषद गटात इच्छुकांनी संपर्काची मोठी मोहीम हाती घेतली आहे. या संपर्क मोहिमेतून उमेदवारी आपल्याला मिळेल असा विश्वास इच्छुक व्यक्त करत असून वरवंड आणि पारगाव गटात राष्ट्रवादीच्या थोरात गटाकडून कै.डि.के. खळदकर यांच्या सून आणि डॉ.विशाल खळदकर यांच्या पत्नी डॉ.गायत्री खळदकर आणि पंचायत समितीसाठी वरवंड गावचे मा.उपसरपंच प्रदीप दिवेकर यांची नावे जवळपास निश्चित समजली जात आहे.

भाजपकडून आमदार राहुल कुल यांचे विश्वासू सहकारी संजय दिवेकर यांच्या पत्नी सारिका दिवेकर, गोरख दिवेकर यांच्या पत्नी सुनिता दिवेकर व तुषार दिवेकर यांच्या पत्नी साधना दिवेकर किंवा ज्ञानेश्वर (माऊली) ताकवणे यांच्या पत्नी पैकी एक नाव आज जाहीर होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पंचायत समितीसाठी थोरात गटाकडून प्रदीप दिवेकर, सागर नानासाहेब फडके यांचे नाव पुढे येत असून कुल गटाकडून अजूनतरी तश्या नावाची मोठी चर्चा होताना दिसत नाहीये मात्र जर जिल्हा परिषद गटात उमेदवारी मिळाली नाही तर दोन इच्छुकांपैकी एकाचे किंवा नानगाव येथून एकाचे नाव कुल गटाकडून पुढे येईल असे एकंदरीत दिसत आहे.
वरवंड – पारगाव गटात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी थोरात गटात काटे की टक्कर होईल असे एकंदरीत बोलले जात आहे. दोन्ही बाजूचे उमेदवार हे तुल्यबळ असल्याने दोन्ही गटाकडून यावेळी मोठी तयारी सुरु करण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थिती मध्ये उमेदवार निवडून आणायचाच असा प्रण दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. त्यामुळे केडगाव – खुटबाव गटानंतर नेत्यांचे सर्वात जास्त लक्ष हे याच गटावर असणार आहे.







