Daund : भांडगाव जवळ चोरट्यांनी आणलेली तिजोरी सापडली, यवत पोलीसांचे नागरिकांना आवाहन



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

यवत पोलिस स्टेशन हद्दीतील भांडगाव गावच्या हद्दीत पुणे सोलापुर हायवे रोडचे बाजुला असणाऱ्या पारगे फार्म हाऊसचे पाठीमागे एक तिजोरी मिळून आली आहे. या तिजोरीबाबत कुणाला काही माहिती असल्यास त्यांनी 

भाऊसाहेब पाटील (पोलीस निरीक्षक यवत पोलीस स्टेशन) गणेश पोटे पो.ना. 9923892525, 7020990790 या नंबरवर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार काही अज्ञात इसमांनी एक तिजोरी आणुन ती वरील ठिकाणी फोडत असलेबाबत ग्रामस्थांकडून यवत पोलिसांना माहिती देण्यात आली. हि माहिती मिळताच यवत पोलिसांनी त्याबाबत स्वतः जाऊन खात्री केली.

त्यावेळी तिजोरी तेथे आढळून आली व ती बंद अवस्थेत होती. हि तिजोरी सोनाराची अथवा एखाद्या बँकेची असण्याची शक्यता आहे. तरी सदर तिजोरी  कोणाची असल्यास यवत पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा असे आवाहन यवत पोलीसांनी केले आहे.