Big Breaking : दौंडमध्ये वाळूमाफियांवर पोलीस निरीक्षक नारायण पवार यांची मोठी कारवाई, 1 कोटी 20 लाखाचा मुद्देमाल नष्ट



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अब्बास शेख)

दौंड तालुक्यातील मौजे देउळगाव राजे, वडगाव दरेकर, पेडगाव या भागात भिमा नदिचे पात्रात मोठया प्रमाणावर वाळु उपसा केला जात आहे अशी बातमी दौंड पोलिसांना मिळाली होती.

यावेळी दौंड चे पोलीस निरीक्षक नारायण पवार, पो.हवालदार असिफ शेख ,पो.हवालदार पाडुरंग थोरात, पो.नाईक आण्णासाहेब देशमुख, पो. कॉस्टेबल अमोल गवळी, किरण राउत, अमोल देवकाते, रवी काळे , किशोर वाघ, चालक पो.नाईक, शैलेश रणसिग, तसेच ६ होमगार्ड असे पथक तयार करण्यात आले. व करून रात्री ११:०० वा. पासुन सदरचे गावामध्ये जावुन पाहणी केली असता काही इसम हे फायबर व सेक्शन बोटीचे सहायाने वाळु उपसा करीत असताना त्यांना दिसुन आले.

पोलिसांनी रात्रीच्या वेळी स्थानिक गावतील एक छोटी बोट मदतीला घेवुन नदी पात्रात जावुन कारवाई करीत असताना वाळु माफियांना पोलीस आल्याची चाहुल लागताच ते बोटी घेवुन पळुण जावु लागले या वेळी पोलीस निरीक्षक नारायण पवार यानी तत्परता दाखवुन एका फायबर बोट मध्ये दोन पोलीस समवेत जावुन बोट ताब्यात घेतली व त्या मोठया फायबर बोटीचे सहायाने इतर सर्व बोटी ज्या दोन ते तीन कि.मी. लांब पाण्यात पाठलाग करून सर्व बोटीमध्ये एकएक पोलीस बसुन ६ फायबर बोटी व ३ सेक्शन बोटी या वडगाव दरेकर हदिदमध्ये आणुन महसुल चे मदतीने जिलेटीनचे सहायाने ब्लास्टीग करून जागीच नष्ट करण्यात आल्या.

सदरची कारवाई ही दि.१२/११/२०२० रोजी रात्री ११:०० पासुन आज दि.१३/११/२०२० रोजी दुपारी १३:०० वाजेपर्यंत चालु होती सदर कारवाईमध्ये १ कोटी २० लाख रूपयेचा मुददेमाल जागीच नष्ट करण्यात आला. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अतिरीक्त पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते,  व दौंडचे उपविभागीय पोलीस अधीकारी  राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी केली आहे.

या कारवाईमध्ये अनिल पोपट गिरमकर (रा.आर्वी ता.श्रीगोदा जि.अ.नगर ) दादा झुंबर गिरमकर, बबलु पांडुरंग इफते (रा.देउळगाव राजे ता.दौड जि.पुणे) दिपक सुरेश माने (रा.वडगाव दरेकर ता.दौड जि.पुणे) महेश उर्फ पप्पु हनुमंत कोथबिरे (रा.नवनाथ नगर ता.श्रीगोदा जि.अ.नगर ) गणेश मोहन शेजळ (रा.वडगाव दरेकर ता.दौड जि.पुणे यांच्या विरूध्द दौंड पोलीस ठाण्यात  वाळु चोरीचा गुन्हा दाखलकरण्यात आला आहे.