Breaking News : पाटस मधून गावठी पिस्टलसह 2 काडतुसे, मोटरसायकल, मोबाईल असा 1 लाख 18 हजारांचा मुद्देमाल जप्त, LCB ची धडक कामगिरी



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

आज दि. १३ नोव्हेंबर रोजी पुणे ग्रामीण LCB टिमने पाटस मधून गावठी पिस्टलसह 2 काडतुसे जप्त केली. हि कारवाई पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

मिळालेल्या माहितीनुसार यवत पोलीस स्टेशन हद्दीत असणाऱ्या पाटस उड्डान पुलाच्या शेजारील सर्व्हीस रोडवर आरोपी लक्ष्मण उर्फ लखन दत्तात्रय सपकाळ (वय ३५ रा.कानगाव, वरसगाव वस्ती, ता.दौंड जि.पुणे मूळ रा.वरसगाव गोरडवाडी ता.वेल्हा जि.पुणे) याने विनापरवाना व बेकायदेशीर हेतूने आरोपी दिपक उर्फ मोगल्या पासलकर  (रा.कुरण बु. ता.वेल्हा जि.पुणे) याच्याकडून पिस्तुल विकत घेऊन तो स्वत: जवळ बाळगत होता. 

LCB टीमने ज्यावेळी त्याची झडती घेतली त्यावेळी त्याकडे एक गावठी पिस्टल व दोन जिवंत काडतुसे तसेच मोटरसायसकल, मोबाईल असा एकुण किं.रु. १ लाख १८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर आरोपीस पुढील कारवाईसाठी यवत पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट सो. यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पो.निरीक्षक पृथ्वीराज ताटे, पोहवा. महेश गायकवाड, 

पोहवा. निलेश कदम, पोहवा. विदयाधर निचित, पोहवा. सचिन गायकवाड, पो.ना. सुभाष राऊत, पो.ना. गुरु गायकवाड यांनी केलेली आहे.