केडगाव स्टेशन येथील ‘प्रगती मेडिकल’ च्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

केडगाव : केडगाव स्टेशन परिसरातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी प्रगती मेडिकल, केडगाव स्टेशन यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात पुणे येथील नामांकित मधुमेह तज्ज्ञ डॉ. अमित अरहुनसी (MBBS,M.Dip.Diab.) यांनी वैद्यकीय सेवा पुरवली.

या शिबिरात केडगाव तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागातील अनेक नागरिकांनी सहभाग नोंदवला. रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना आरोग्य व मधुमेहाविषयी योग्य सल्ला, आहारविषयक मार्गदर्शन व आवश्यक उपचार देण्यात आले. ग्रामीण व निमशहरी भागातील रुग्णांना वेळेत आणि माफक दरात दर्जेदार उपचार मिळावेत, या उद्देशाने प्रगती मेडिकल तर्फे केडगाव स्टेशन येथे मधुमेह रुग्णांसाठी साप्ताहिक वैद्यकीय सेवा (OPD) सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, दर महिन्याच्या पहिल्या मंगळवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत अशा प्रकारचे मोफत आरोग्य शिबिर नियमितपणे आयोजित करण्यात येणार आहे. परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रगती मेडिकल, केडगाव स्टेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.