Covid19 : भारतीय सम्राट अशोक मोर्य स्मारक कृती समितीच्या वतीने दौंडमध्ये कोविड योद्ध्यांचा सन्मान



दौंड: सहकारनामा ऑनलाइन (अख्तरकाझी)

कोरोना महामारीच्या आपतकालीन दिवसांमध्ये फक्त स्वतःच्या आरोग्याचा विचार न करता इतरांचा जीव वाचावा म्हणून आपला जीव धोक्यात घालून ज्यांनी सामाजिक सेवा केली अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या कोविड योद्ध्यांचा भारतीय सम्राट अशोक मोर्य स्मारक कृती समितीच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला. 

शहर व तालुक्यातील सरकारी रुग्णालय, नगरपालिका, आरोग्य विभाग, महावितरण कंपनी, पोलीस स्टेशन, अंगणवाडी सेविका, महसूल विभाग, पत्रकार मित्र, तसेच सामाजिक व राजकीय संघटनेतील ज्यांनी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी बजावली अशांना  समितीचे अध्यक्ष मनोज गायकवाड, संजय चितारे, सचिन खरात, रमेश तांबे, शंकर बनसोडे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजय थोरात, प्रमोद थोरात, गौतम गायकवाड, श्रीकांत थोरात, अशोक गायकवाड, विजय शिंदे, शेरखान पठाण, कपिल रणदिवे, तसेच सिद्धार्थ नगर येथील भीम सैनिकांचे सहकार्य लाभले.