Padvidhar Election : भाजपचे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार संग्राम देशमुख यांना विजयी करण्याचे आ.राहुल कुल यांचे आवाहन



पुणे/दौंड : सहकारनामा ऑनलाइन

पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारार्थ दि.१७ नोव्हेंबर रोजी श्रीकृष्ण मंगल कार्यालय, चौफुला येथे बैठक पार पडली. यावेळी दौंडचे विद्यमान आमदार राहुल कुल यांनी भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांना प्रथम क्रमांकांची पसंतीचे मते देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन पदवीधर मतदार संघाच्या उमेदवारांना केले.

यावेळी भाजपा उमेदवार संग्राम देशमुख म्हणाले, सामान्य माणसाला बळ देण्यासाठी देशमुख घराण्याने आयुष्य खर्च केले आहे. प्रामाणिक व विश्वासावर सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करताना जनतेने भरभरून साथ दिली. पदवीधर व अन्य प्रत्येक प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक वेळेची संधी म्हणून मला निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला भाजपचे पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्ष किरण दगडे पाटील, पुणे जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा सौ. कांचन कुल, पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे, सरचिटणीस पुणे जिल्हा सुदर्शन भाऊ चौधरी, सरचिटणीस पुणे जिल्हा अविनाश मोटे, दौंड तालुका अध्यक्ष माऊली आण्णा ताकवणे, जालिंदर भाऊ कामठे अध्यक्ष पुरंदर तालुका, गणेश आखाडे माजी तालुका अध्यक्ष, तानाजी दिवेकर माजी सरचिटणीस भाजपा, शिवाजी आबा दिवेकर, ऋतुजाताई जाधव, आदी उपस्थित होते.

असा असेल पदवीधर निवडणूक कार्यक्रम..

राज्यातील ५ पदवीधर मतदार संघाच्या निडणुकांसाठी १ डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार आहेत. निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण ५ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन जागा पदवीधर मतदारसंघ तर २ जागा शिक्षक मतदारसंघाच्या आहेत. या पाच जागांसाठी पुढील महिन्यात १ डिसेंबरला मतदान होईल तर ३ डिसेंबरला निवडणुकांचे निकाल जाहीर होतील अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.