पुणे : सहकारनामा ऑनलाइन
दि.१८ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वॉन्टेड आरोपीचा शोध घेणे कामी बारामती तालुका येथे पट्रोलिंग करीत असताना सदर पथकाला गोपनीय बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीवरून जैनक वाडी ता.बारामती येथे जाऊन इसम लखन कांतीलाल सूर्यवंशी (वय २८वर्षे रा जैनक वाडी ता.बारामती जि पुणे) यास ताब्यात घेतले असता तो वापरीत असलेली दुचाकी मोटार सायकल ही चोरीची असल्याचे समजले. त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने आणखी एक मोटार सायकल चोरून आणल्याचे सांगितले यावरून त्याचे ताब्यातून २० हजार रुपये किंमतीची एक काळ्या रंगाची होंडा कंपनीची शाईन मॉडेल मोटार सायकल तसेच २० हजार किंमतीची एक काळे लाल पट्टे असलेली हिरो होंडा कंपनीची पॅशन मोटार सायकल असा एकूण ४० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपीकडे मिळालेल्या मोटार सायकल ह्या बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे भा द वी ३७९ नुसार दाखल असलेल्या गुन्ह्यातील आहेत. सदरच्या पथकाने वरील २ मोटार सायकल व आरोपी पुढील तपास कामी बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे.
सदरची कारवाई ही पुणे ग्रामिणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी बारामती श्री शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट,
पोलिस उप निरीक्षक शिवाजी ननवरे, पो हवा अनिल काळे, पो हवा रविराज कोकरे
पो हवा ज्ञानेश्वर क्षीरसागर, पो हवा राजपुरे
पो ना अभिजित एकशिंगे, पो ना विजय कांचन, पो कॉ धिरज जाधव यांनी केली आहे.