आम्ही केडगावकर रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, 333 रक्तदात्यांकडून रक्तदान

अब्बास शेख

केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव येथे रविवार दि. 7 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘आम्ही केडगावकर रक्तदान शिबिरास’  नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या रक्तदान शिबिरात सुमारे 333 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

दौंड तालुक्याच्या माजी आमदार श्रीमती रंजनाताई कुल, माजी आमदार रमेश आप्पा थोरात, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार भिमा पाटस सहकारी कारखान्याचे संचालक आप्पासाहेब हांडळ, किरण देशमुख, अभिषेक थोरात, निलेश कुंभार आदी मान्यवरांनी भेट दिली.

या शिबिरामध्ये महिलांचा विशेष सहभाग सर्वांचे लक्ष वेधून गेला. अनेक पती-पत्नी जोडप्यांनी या शिबिरामध्ये रक्तदान केले. पोलीस, पत्रकार, युवक आणि ज्येष्ठ अश्या सर्वांनीच यामध्ये सहभाग घेउन रक्तदान शिबीर पार पाडले. शिवशंभो ब्लड बँक मोहोळ यांनी हे रक्त संकलन केले तर निरामय हॉस्पिटल केडगाव यांनी हे रक्त स्टोरेज करण्यास सहकार्य केले.

या रक्तदान शिबिराचे आयोजन आम्ही केडगावकर-बोरिपार्धी ग्रुप ने केले होते त्यास  शिवजयंती उत्सव समिती केडगांव, अखिल भारतीय मराठा महासंघ, दौंड तालुका, भारतीय जैन संघटना केडगांव व जैन श्रावक संघ केडगाव, मुस्लीम समाज बांधव केडगांव, एक मित्र एक वृक्ष ग्रुप, केडगाव, पोलीस कर्मचारी व पोलीस मित्र संघटना, पत्रकार संघटना दौंड तालुका, स्वामी समर्थ मठ (२२ फाटा) केडगाव, अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती, दौंड तालुका फोटोग्राफर असोसिएशन, संयुक्त जयंती उत्सव समिती, केडगाव कुंभार समाजोन्नती मंडळ दौड तालुका, साई गुप, दौड तालुका भीम क्रांती मित्र मंडळ, समस्त ब्राम्हण समाज केडगांव, नाथभक्त परिवार केडगाव, समस्त ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.

शिबिराचे संयोजक म्हणून नितीन जगताप, राहुल हांडळ, दत्तात्रय शेळके, सचिन गायकवाड, आशिष नहाटा, समीर पठाण, धनराज मासाळ, अर्शद शिकिलकर, निलेश मेमाणे,  प्रितम गांधी, सलमान खान, समिर दफेदार, वसीम बेग, अनिकेत गायकवाड, समीर थोरात, आविनाश खुंटे, देवेंद्र पाटील, कवी खोमणे यांनी काम पाहिले. जागे साठी विशेष सहकार्य लालचंद नगर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, केडगांव व्यापारी संघटना यांनी केले.